fbpx

कॉंग्रेस तोंडघशी, तो प्रकाश लेजर वेपनचा नव्हे तर कॅमेऱ्याच्या लाइटचा

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. गृहमंत्रालयाकडून त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती मात्र आता गृहमंत्रालयाने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

अमेठीमध्ये बुधवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश पडला. तर हा प्रकाश लेजर वेपनचा असू शकतो असा तर्क काँग्रेस पक्षाकडून लावण्यात आला होता. तसेच याबाबतचे पत्र देखील गृहमंत्रालया देण्यात आले होते.

गृहमंत्रालया कडून असे सांगण्यात आले आहे की, राहुल गांधी यांच्या चेहेऱ्यावर पडलेला प्रकाश हा कोणत्याही लेजर वेपन्चा नसून तो प्रकाश कॅमेऱ्याच्या लाइटचा आहे. काँग्रेसचा फोटोग्राफर राहुल गांधी यांचं शूटिंग घेत असताना तो प्रकाश पडला आहे. अद्याप आमच्याकडे काँग्रेसचं पत्र आलं नाही. या घटनेची चर्चा माध्यमांमध्ये झाल्यानंतर आम्ही तपास केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की राहुल यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश हा कॅमेऱ्याचाचं आहे.