fbpx

सुजय विखेंनी भाजपमध्ये जावे, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा – अहमदनगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. लोकसभेसाठी आघाडीकडून उमेदवारी डॉ. विखे यांना मिळणार नसल्यास विखे कुटुंबीयांनी भाजपमध्ये जावे, अशी सूचना प्र‌वरानगर येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना केली.

डॉ. सुजय यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी नगरमधून जोरदार कंबर कसली आहे. युवकांचे मजबूत संघटन करून गेली तीन वर्षे नगर मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसच्या विखे यांना सोडण्यास शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे

दरम्यान,सुजय विखे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. सुजयने निर्णय घ्यावा, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे