fbpx

…म्हणून मी औरंगाबाद मधून निवडून आलो – इम्तियाज जलील

imtiyaz-jaleel

टीम महाराष्ट्र देशा : हैदराबादमधील जनतेनं मला प्रत्यक्षात मतदान केलं नसलं तरी तिथल्या प्रत्येक घरातून माझ्या विजयासाठी दुवा मागितली जात होती. म्हणून मी निवडून आलो, असे म्हणत एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या विजयाबाबत प्रतिक्रिया दिली. ते आज हैद्राबाद मध्ये बोलत होते. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाने आयोजित केलेल्या सत्कार सभेसाठी गेले होते.

यावेळी जलील म्हणाले की,हैदराबादमध्ये जेवढे ओवैसींचे चाहते आहेत त्यापेक्षा जास्त मराठवाडा आणि औरंगाबादमध्ये माझे चाहते आहेत.तसेच हैदराबादमधील जनतेनं मला प्रत्यक्षात मतदान केलं नसलं तरी तिथल्या प्रत्येक घरातून माझ्या विजयासाठी दुवा मागितली जात होती, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदार संघांमध्ये धक्कादायक निकाल पाहिला मिळाले. त्यातलाच एक निकाल म्हणजे औरंगाबाद मतदारसंघाचा. औरंगाबाद मतदार संघांमधून यावेळेस शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली.