एक्झिट पोल : अमोल कोल्हेंचा पराभव करत आढळराव पाटील मारणार विजयाचा चौकार

टीम महाराष्ट्र देशा : साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.
याचदरम्यान, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील झेंडा फडकवणार असल्याचे दिसून आले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

विशेष म्हणजे, अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत असते, त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ शकते, पण निकाल हा अखेर असणार आहे. असे अमोल कोल्हे यांनी म्हंटले होते. तसेच एक्झिट पोलवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. एक्झिट पोलने जो निकाल दाखवला आहे. नक्कीच त्यापेक्षा वेगळा निकाल लागणार आहे. शेतकरी वर्गाची भाजपावर जी नाराजी आहे. तीच नाराजी मतदानावर फरक पडणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांबाबत त्यांना विचारले असता, लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या सभा घेतल्या होत्या त्या सभांचा फायदा आघाडीला होणार आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

परंतु एक्झिट पोलचा निकाल हा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने लागला आहे. मात्र एक्झिट पोल हा केवळ अंदाज असून येत्या २३ मे ला खरे चित्र समोर येणार आहे.