या चोरीप्रकरणाचा तब्बल सातशे पोलीस करत होते तपास

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंतीबेन मोदी यांच्या पर्स चोरीप्रकरणी तपास यंत्रणांनी तब्बल ७०० पोलीस कर्मचारी लागले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक करून त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त केले.

या प्रकरणाच्या तपाससाठी तब्बल ७०० पोलीस कर्मचारी कामाला लागले होते. पर्स हिसकावत असतानाचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार, रुट मॅपच्या आधारे पोलिसांनी २०० सीसीटीव्ही फुटेज पडताळून हरयाणातील सोनीपतमधून गौरव नावाच्या एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी आकाशला सुल्तानपुरीमधून पोलिसांनी अटक केली. पोलिसांना आकाशकडून दमयंतीबेन यांची पर्स आणि मोबाईल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंतीबेन शनिवारी दिल्लीतील गुजराती समाज भवनमध्ये राहणार होत्या. त्यांनी जुन्या दिल्लीहून ऑटो पकडून त्या आपल्या कुटुंबासोबत गुजरात समाज भवनला पोहोचल्या. त्यावेळी ऑटोतून उतरत असताना स्कूटीवरून दोन जण आले आणि त्यांनी दमयंती यांची पर्स हिसकावून पोबारा केला.

दरम्यान, दमयंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्समध्ये जवळपास ५६ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. यावरुन दिल्लीत राजकारणही सुरु झाले. भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीत घुसखोरी करणाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप केला होता. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ” दोषी बाहेरचा असो किंवा दिल्लीतील, सर्वांना शिक्षा मिळालीच पाहिजे,” असे प्रत्युत्तर दिले होते. या आरोपप्रत्यारोपांच्या गदारोळात मात्र या घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :