नासधूस करणाऱ्यांना अटक करा, शेतकऱ्यांना नाही; रविनाचा खुलासा

मुंबई : अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे रविना टंडनने म्हटले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन रविनाने हे ट्वीट केले होते.

“अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.”असे अभिनेत्री रविना टंडन हिने ट्वीट केले होते. त्यानंतर रविनावर सर्व स्तरातून टीका होतं होती.

दरम्यान रवीनाने आता आपल्या ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव करत आपल्या ट्वीटचा विपर्यास करण्यात आला. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं आपण म्हंटल्याचं रवीनाने सांगितले.