fbpx

पुण्याच्या दौऱ्यावरून परतत असतांना राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. ठरल्याप्रमाणे हा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र राज ठाकरे यांनी हा दौरा दोनचं दिवसात आटोपला आहे. पुढच्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

दौरा आटोपल्यानंतर परतत असतांना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे आमच्या घरी नेहमी जानेयेणे असते. म्हीही त्यांच्या घरी जातो. आमचे कौटुंबिक संबंध आहेत, असे बाबासाहेब पुरंदरे या भेटीबाबत म्हणाले.

दरम्यान पुण्याच्या दौऱ्यावर आले असता राज ठाकरे यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. तर सबंधित मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या. यावेळी ठाकरे यांनी दोन दिवसात जवळपास 950 पदाधिकऱ्यांशी संवाद साधला. तर १५ जून नंतर पिंपरी-चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली होती. तर पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बैठक सुरु असणाऱ्या क्लब हाऊसच्या गेटवर जमा करण्यात आले होते.