fbpx

राहुल गांधी म्हणजे निपाह व्हायरस – भाजप मंत्री 

नवी दिल्ली : हरयाणातील भाजपचे मंत्री अनिल वीज हे कायमच आपल्या वादग्रस्त  वक्तव्यासाठी चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून, नव्या वादाला तोंड फोडलं आहे . त्यांनी राहुल गांधी यांची तुलना निपाह व्हायरसशी केली आहे ‘राहुल गांधी हे निपाह व्हायरससारखे असून जो पक्ष त्यांच्या संपर्कात येईल तो नष्ट होईल असे ट्विट वीज यांनी केले.

दरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने याबाबत  अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.कर्नाटकात सत्ता स्थापन  करण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी आघाडी करुन सरकार स्थापन केले आहे.यावर टीका करताना त्यांनी राहुल गांधी हे  निपाह व्हायरस सारखे असल्याचं म्हंटलं आहे.