जखमी युवकाला भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात पाणी

narendra modi

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर आणि कठोर निर्णय आजवर देशाने पाहिले आहेत. मात्र, एका जखमी युवकाला भेटल्याना भावनिक झालेले पंतप्रधान आज पहायला मिळाले आहेत.

पश्चिम बंगालमधील मंदपूर येथे आज पंतप्रधान मोदींच्या रैलीच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप कोसळला. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना भेटण्यासाठी मोदी गेले असता एका युवकाला भेटताना ते भावुक झाले, यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याच दृश्य सर्वाना पहायला मिळाल.

नरेंद्र मोदी यांच्याकडे कठोर पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं, अनेकवेळा विरोधकांनी याच मुद्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड देखील उठवल्याच पहायला मिळाल आहे. मात्र, आज जखमी कार्यकर्त्यांना भेटताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटुन आल्याने ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.