सत्तेची फार काळजी करू नका, एका पावसाने सत्ता येते आणि जाते… – शरद पवार

blank

सांगली : खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच खानापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही सदाशिवराव पाटील यांच्या पाठीशी राहू, असे पवार म्हणाले.

यावेळी बोलताना पुढे खा. पवार म्हणाले, ‘मला खानापूर मतदार संघाने पहिल्यापासून साथ दिली आहे. खानापूरचे हणमंतराव पाटील आमदार असतानाच या मतदार संघाशी माझे नाते जुळले. मध्यंतरीच्या काळात सदाशिवराव पाटील पक्षात नव्हते, तरीही ते कधी पक्षात नसल्याचे जाणवले नाहीत. आम्ही त्यांना आमचेच मानायचो,’ असे शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भर साताऱ्यात पावसात प्रचाससभा घेतली होती. या सभेमुळे अनेक समीकरण बदलली. याबाबत भाष्य करताना ते म्हणाले, ‘सत्तेची फार काळजी करू नका. एका पावसाने सत्ता येते नी जाते,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुमनताई पाटील, विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, रावसाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.