fbpx

प्रकाश आंबेडकरांचं कामही भाजप प्रमाणेचं संभ्रम निर्माण करण्याचं – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हंटले. आंबेडकरांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार वंचित आघाडीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगत आहे. पण या चर्चा तथ्यहीन असून भाजपाप्रमाणेच संभ्रम निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. असे नवाब मलिक यांनी म्हंटले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.

दरम्यान, नवाब मलिक यांनी आंबेडकरांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण या चर्चा तथ्यहीन असून भाजपाप्रमाणेच संभ्रम निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. असे नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.