इन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले

blank

टीम महाराष्ट्र देशा : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचे शेअर्सचे बाजार भाव एका दिवसात १७ टक्क्यांनी  कोसळले. त्यामुळे कंपनीच्या गुंतवणुकदारांचे ५३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये १६.२१ टक्क्यांच्या नुकसानीमुळे ६४३.३० रुपयांवर आला होता. निफ्टीमध्ये कंपनीचे शेअर्स १६.६५ टक्क्यांनी घसरले आणि ६४० रुपयांवर बंद झाले.

इन्फोसिस कंपनी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय हे अल्पकालीन फायद्यासाठी गैरप्रकार करतात, या आशयाचे पत्र काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला पाठवले. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

शेअर्समधील जोरदार घसरणीमुळे कंपनीचे बाजार भांडवल ५३,४५०.९२ कोटी रुपयांनी कमी होऊन २,७६,३००.०८ कोटी रुपयांवर आले. कंपनीचे प्रमुख विशाल सिक्का यांनी कंपनी सोडल्यानंतर दोन वर्षात हे आरोप झाले आहेत. हे आरोप कंपनीच्या लेखा परीक्षण मंडळापुढे ठेवण्यात येतील, कंपनीची ऑडिट समिती व्हिसलब्लोअरच्या तक्रारीवर स्वतंत्र चौकशी करेल, असे इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :