fbpx

दहशतवाद्यांची माहिती द्या आणि सरकारी नोकरी मिळवा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांच्या सुरक्षे मध्ये वाढ करण्यात आली असून जम्मू काश्मीर राज्यात विशेष सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर जम्मू-काशमीर पोलिसांकडून एक विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिल्यास शासनकडून सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी जम्मू काश्मिर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टरही जारी केले असून त्यांच्याबद्दल माहिती पुरविणाऱ्यास मोठे बक्षिस म्हणून सरकारी नोकरी दिली जाणार आहे. किश्तवाड पोलिसांनी शहरभर या दहशतवाद्यांचे पोस्टर लावले आहेत. दहशतवाद्यांची माहिती देणे, त्यांना जिवंत किंवा मृत पकडून दिल्यास लाखो रुपयांचे बक्षिसही देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान या पोस्टरमध्ये एकूण 7 दहशतवाद्यांचे फोटो आहेत. यामध्ये एचएम गटाचा दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ जहांगिर सहभागी आहे याशिवाय पोस्टरमध्ये रियाझ अहमद, ओसामा बिन जावेद, मुदस्सिर हुसेन, तालिब हुसेन, जमालदीन आणि जुनेद अक्रम यांची नावे आहेत. जो व्यक्ती या दहशतवाद्यांची माहिती देणार आहे त्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.