सत्ता मिळाल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू,कॉंग्रेसच्या घोषणेने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा – मुस्लीम महिलांना सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान करणारा तीन तलाकविरोधी कायदा केंद्रात सत्तेत आल्यास रद्द केला जाईल अशी घोषणा काँग्रेस पक्षाने केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीत आयोजित पक्षाच्या अल्पसंख्याक अधिवेशनात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सिलचरच्या खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली.

तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही देव यांनी केला आहे. आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे मानले, असं सुष्मिता देव यांनी सांगितलं.