fbpx

सत्ता आल्यास तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करु,पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आश्वासन

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणूक 2019साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय आहे स्पष्ट केले आहे. मुस्लीम मतांची प्राप्ती करण्यासाठी मुस्लीम महिलांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या गेलेल्या तिहेरी तलाक बद्दल जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसला खरंच पुरोगामी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सत्ता आल्यास तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. हे आश्वासन देण्यामागे नेमके कारण काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. समाजातल्या सर्व लोकांशी चर्चा करुन तिहेरी तलाकवर निर्णय घेतला जाईल असे जरी राष्ट्रवादीने म्हटले असले तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेले हे आश्वासन असल्याचे स्पष्ट होत आहे.