‘गप्प बसलो असतो तर भाजपने मला पंतप्रधान बनवल असत’

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये सामील झालेल्या दलित नेता उदित राज यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. “मी जर गप्प बसलो असतो तर भाजपने मला पंतप्रधान बनवल असत, मात्र मी गप्प बसण्यासाठी जन्मलेलो नाही” आशा आशयाच  ट्विट करत उदित राज यांनी भाजपवर टीका केली आहे.

उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघातून भाजप कडून उमेदवारी न मिळाल्याने दलित नेते उदित राज यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसचा हात पकडला. त्यांनी बुधवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. साध्य उदित राज हे भाजपचे विद्यमान खासदार होते. मात्र उमेदवारीचे तिकीट भाजपने कापल्याने नाराज उदित राज यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .उदित राज यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारवर टीकात्मक टिपणी केली आहे. तर ‘#BJP भगाओ देश बचाओ’ असा ट्रेंड सुरु केला आहे.

उदित राज यांचे ट्विटLoading…
Loading...