fbpx

आता काँग्रेसला उमेदवारांसाठी जाहिरात द्यावी लागेल : दानवे

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसचा राज्यासह देशात दारूण पराभव झाला आहे. या विजयानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. याचा प्रत्यय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यामुळे येत आहे.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता विधानसभेची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना दानवे म्हणाले आम्ही आजपासूनच विधानसभेच्या तयारीला लागलो असून येत्या विधानसभेत कॉंग्रेसला उमेदवार देखील मिळणार नाही , त्यांना त्यासाठी जाहिरात द्यावी लागेल असं म्हणत दानवे यांनी रावसाहेब कॉंग्रेसची खिल्ली उडवली आहे.