बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा

पटना: बिहारमधील बोधगया येथे २०१३ मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इम्तियाज अन्सारी, हैदर अली, मुजीबउल्लाह, ओमर सिद्दीकी आणि अजरुद्दीन कुरेशी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

म्यानमारमध्ये मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराविरोधात हे स्फोट घडवण्यात आले असल्याची माहिती या दहशतवाद्यांनी दिली होती. दोषी दहशतवाद्यांच्या शिक्षेसंदर्भात शुक्रवारी न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने या पाचही दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

You might also like
Comments
Loading...