रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मोठा धक्का,’हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

टीम महाराष्ट्र देशा – आयपीएल २०१९च्या सुरुवातीला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मागील तीनही सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. मात्र आरसीबीचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याला खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा दुखापतग्रस्त झाला आहे. दुसऱ्या सामन्यानंतर स्टेनच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनची वैद्यकीय चाचणी केली आणि ही दुखापत गंभीर असल्याचे समजले. त्यानंतर मात्र स्टेनने विश्वचषकासाठी आयपीएलमधून काढता पाय घेतला आहे.

स्टेनन यावर्षी आयपीएलमध्ये २ वर्षांनी पुनरागमन केले होते. तो या मोसमाआधी शेवटचे २०१६ मध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता.