आणखी एक राष्ट्रवादीचा ‘हा’ युवानेता भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. सुजय विखे पाटील आणि रणजीतसिंह मोहिते – पाटील यांनी पारंपारिक पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आहे.आता भाजपच्या वाटेवर राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर हे देखील आहेत.

Loading...

समीर दुधगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे,आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. या भेटीने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

परभणी जिल्हात समीर दुधगावकर हे अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रीय आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील लोकसभा निवडणुकीची उमेदवारी विजय भाबळे यांना दिली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राजेश विटेकर यांना देण्यात आली आहे.समीर दुधगावकर यांनी लोकसभेची उमेदवारी लढविण्यासाठी प्रयत्न केले होते, राष्ट्रवादीकडून  लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी समीर यांची अपेक्षा होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळवण्यात अपयश आले आहे.

कॉग्रेसचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे रणजीत मोहिते – पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.या दोघांचीही उमेदवारी लोकसभेसाठीची जवळपास निश्चित झाली आहे.त्यामुळे समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश केल्यानंतर समीर यांना देखील भाजप कडून लोकसभा उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...