fbpx

अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा सुरू !

टीम महाराष्ट्र देशा – राळेगणसिद्धीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग हे दोन नेते अण्णा हजारेंना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, यासह आणखी काही मागण्यासाठी अण्णा हजारे उप्ष्णाला बसले आहेत.
अण्णा हजारेंना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे ताकद उभी करणं गरजेंच आहे.

आंदोलन त्यांच्यासह संपाव असं सरकारला वाटतं, शिवसेना ते होऊ देणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं अण्णा हजारे यांचे म्हणण आहे.

3 Comments

Click here to post a comment