fbpx

मानलं या शिवसैनिकाला, पराभूत होऊन देखील नेहमीप्रमाणे भरवणार जनता दरबार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील यांचा पराभव करत आढळरावाचं चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंग केले. मात्र अस असलं तरी देखील शिवाजीराव आढळराव पाटील हे नेहमीप्रमाणे आपला जनता दरबार भरवणार आहेत.

दरम्यान , नेहमीप्रमाणे रविवारी लांडेवाडी येथे जनता दरबार आहे. सर्व नागरीक व शिवसैनिकांसाठी मी उपलब्ध राहील असं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

अमोल कोल्हे यांचं फॅन फॉलोविंग शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संभाजी मालिकेमुळे ते घराघरात पोहचले आहेत. त्याचाच फायदा त्यांना झाला. दरम्यान, तीन टर्म खासदार राहिलेले आढळराव पाटील चौकार मारण्यात अपयशी ठरले आहे