fbpx

भाजपची मुलुख मैदानी तोफ एकनाथ खडसे प्रचारात सक्रिय होणार

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा – प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झाले. उपचार घेऊन ते परत आल्याने मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्महाऊसवर भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती.आजपासून आपण प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी माध्यमांना कळविले आहे.

एकनाथ खडसे आपल्या रोखठोक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत रक्षा खडसे यांनी देखील प्रचाराचा धडाका लावला होता. आता खडसे परतल्याने त्यांचा विजय सुकर होईल असा अंदाज लावला जात आहे.

२६ मार्चपासून खडसे यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनी २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना खडसे अनुपस्थित होते.दरम्यान,खडसे मुक्ताईनगरमध्ये परतल्याचे समजताच निकटवर्तीयांनी भेटीसाठी त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती. खडसे शनिवारी पहाटे भुसावळ येथे दाखल झाले असता त्यांच्या समर्थकांनी रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी केली होती.