fbpx

आयकर भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार कार्ड महत्त्वाचा आधार ठरणार

टीम महाराष्ट्र देशा- मोदी २.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत असून टॅक्समध्ये सुट मिळणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, उर्जा या क्षेत्रांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आयकर भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार कार्ड महत्त्वाचा आधार ठरणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कर परतावा भरताना आपण जिथे गुंतवणूक केली आहे तिथून माहिती मिळवली जाईल. कर प्रक्रियेत काही चौकशी करायची असेल तर त्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. यामुळे करदात्यांचा छळ थांबेल.