महंत नरेंद्र गिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; सुसाईड नोट बनावट, तर…

narendra giri

नवी दिल्ली : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे.

परंतु आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. प्रयागराज येथील पंच परमेश्वरच्या बैठकीत महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट बनावट असल्याचं घोषित करण्यात आलंय. तसेच, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करण्यावरुनही वाद निर्माण झाला आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी सुसाईड नोट बनावट असल्याचं सांगून उत्तराधिकारी घोषित करण्यास नकार दिला आहे.

आता संत बालवीरांचा उत्तराधिकारी होण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. सभेची पुढील तारीख 25 सप्टेंबर जाहीर करण्यात येईल. रवींद्र पुरी यांनी बलवीर गिरी यांच्यावर कोणतेही आरोप केले नसले तरी, त्यांनी सुसाईड नोटच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, बलवीर गिरी हे निरंजनी आखाड्याच्या पंच परमेश्वरचे सदस्यदेखील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या