पंतप्रधानांचा जुना फोटो नेटकऱ्यांनी उकरून काढलाय, पहा काय आहेत कमेंट

श्याम पाटील : राज्यातच नाही तर सबंध जग कोरोनामुळे त्रस्त असताना महाराष्ट्रात मात्र सोशल मीडियावर फक्त भाऊंची हवा आहे. लॉकडाऊनमुळे नेटकरी सध्या रिकाम्या वेळेत फेसबुकवर जास्त वेळ घालवत आहेत. फेसबुकवर नेहमी वेगवेगळे ट्रेंड सुरू असतात मात्र यावेळी फेसबुकवर चारोळी ट्रेंड सुरू आहे.

कसा आहे हा ट्रेंड ?

फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांचे जुने फोटो उकरून काढून त्यावर कमेंट करणे हा झाला ट्रेंड. जुने फोटो उकरून वर काढण्याचा हा काही पहिला ट्रेंड नाही. या आधी सुद्धा हा ट्रेंड अनेकदा चालला मात्र यावेळी यात जरा वेगळाच बदल झालाय. आपल्या मित्राचा एखादा जुना फोटो उकरून काढून त्यावर ‘चारोळी’ कमेंट करणे बर.

आता ‘पोर’ आपल्या मित्रांच्या फोटोवरच थांबलेले नाहीत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर जाऊन सुद्धा कमेंट करू लागलेत. मोदींच्या फोटोवर पोरांनी नुसत्या कमेंटच केल्या नाहीत तर महाराष्ट्राच्या या चारोळी बहाद्दरांनी चारोळीच्या कमेंटचा अक्षरशः धिंगाणा घातलाय.

कमेंटस वाचण्यासाठी ही लिंक आपल्या ब्राव्हझर मध्ये ओपन करा – 

https://m.facebook.com/narendramodi/photos/a.10150258751225165/177527075164/?type=3