मुंबई: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे.
सुधारीत नियमानुसार तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱ्या वेळेस 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता ही रक्कम वाढून 5 हजार इतकी करण्यात आली आहे.
तसेच कारण नसताना हॉर्न वाजवला तर तब्बल 1500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच विनाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस 500 रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. देशभरात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षीत ड्रायव्हींग केल्यास अपघात टळू शकतात. अपघात टाळावे, यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यह इंसान अलग मिट्टी से बना है; भातखळकरांनी उधळली मोदींवर स्तुतिसुमने
- ‘बूंद से गईं सो हौद से नही आती’, म्हाडाच्या भरती प्रक्रियेवरून भातखळकरांचा हल्लाबोल
- …या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात; वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी क्रांतीची पोस्ट
- नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी
- ‘या देशाची माती इतर देशांपेक्षा वेगळी; इथे औरंगजेब जरी आला तर…’ मोदींकडून महाराजांचं स्मरण