माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं

टीम महाराष्ट्र देशा : ‘उतरण’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री रश्मी देसाई हिने आपल्या व्यक्तीमत्वाचे स्वताचे एक वेगळे वलय निर्माण केले आहे.रश्मी देसाईचं नाव टीव्ही यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. काही दिवसांपूर्वीच संपलेल्या बिग बॉसच्या १३ सीझनमुळे रश्मी चांगलीच चर्चेत राहिली होती. यावेळी सिद्धार्थ शुक्लाशी असलेलं तिचं नातं आणि अरहान खान याच्याशी असलेलं अफेअर या सर्व गोष्टींची जोरदार चर्चा झाली. याच शोमध्ये असताना अरहान खाननं तिचा कशाप्रकारे विश्वासघात केला हे समोर आलं मात्र ती या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरी गेली.

आता रश्मीनं एका मुलाखती दरम्यान सांगितले की , मला सतत ट्रोल करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की, हे माझं शरीर आहे. माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन जे मला योग्य वाटतं. कारण यावर फक्त माझा हक्क आहे. यावेळी तिनं अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. स्त्री-पुरुष मानधनाबद्दलही तिनं तिचं मत मांडलं. ती म्हणाली, जर अभिनेत्याला जास्त पैसे मिळत असतील तर ती त्याची मेहनत आहे. मी त्यावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. पण मला तेच मिळत आहे. ज्याच्यावर माझा हक्क आहे.

देसाईनं पुढे असंही म्हटलं आहे की ‘मला माझी साइझ, मेकअप, कपडे, केस आणि लो क्लीवेज यावरुन अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. मी अशा लोकांपैकी आहे. ज्यांचं वजन सतत कमी-जास्त होत असतं. पण आता लोकांना या गोष्टीमुळेही समस्या आहे. अनेकदा असं होतं की लोकांना माझा डान्स किंवा कपडे आवडत नाहीत.पण शेवटी निर्णय माझाच असणार आहे.आपल्या बिनदास्त अदा आणि स्टाईल मुले रश्मी वेगळी ठरते.

हेही पहा: