मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांच्यात निर्णय घेण्याची ‘धमक’ नाही : निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज पूर्ण झाला. यावर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे.निलेश राणे यांनी ट्वीटर च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांचा सिंधुदुर्ग दौरा :

Loading...

१)जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय नाही

२)कोकणातील विकास कामांना दिलेल्या स्थगीतीवर निर्णय नाही

३)निर्णय घेण्याची धमक नाही तर आढावा का?

४)एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला नाही.

५)पत्रकार परिषद नाही.

६)मुख्यमंत्र्यामुळे अंगणेवडीत भाविकांची गैरसोय

वरील प्रश्न विचारात एकंदरीत या दौऱ्याचे फलित काय ? असा प्रश्न विचारला आहे.

तर ,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोला लगावत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा कार्यभार पेलवत नाही. त्यामुळे तेच स्वतःहून पदाचा त्याग करतील. आणि मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,असंही राणे यांनी म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....