शरद पवारांच्या नकारानंतरही पार्थ पवारांचे निवडणूक लढविण्याचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा – मावळ लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या नाकारानंतरही पार्थ पवार यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहेत असे सांगत शरद पवार यांनी मुंबई येथील बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीला नकार दर्शवला होता. परंतु शरद पवार यांनी दिलेल्या नकारच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणा-या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न पवार यांनी मुंबई येथील बैठकीत उपस्थित केला होता. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर मोठे पवार अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे होते.

परंतु पार्थ यांनी मी जर उभं राहिलो तर सगळे एकत्र येतील, काय हरकत नाही. दादांचं म्हणणं आहे की तू आला तरच सीट येणार. त्यामुळे बघूया, पक्ष काय म्हणतोय, असं म्हणत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या नकारच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पार्थ पवार काय म्हणले, “मला असं वाटतं मावळमध्ये मला पहिली दोन वर्ष काम करायला पाहिजे. लोकांना भेटून इथली परिस्थिती, अडचणी नीट समजून घ्यायला हवं. त्यानंतर माझा निवडणुकीला उभं राहायचा प्लॅन होता. पण तुम्ही आताच या असा लोकांचा आग्रह आहे. मी जर उभं राहिलो तर सगळे एकत्र येतील, काय हरकत नाही. दादांचं म्हणणं आहे की तू आला तरच सीट येणार. त्यामुळे बघूया, पक्ष काय म्हणतोय. मावळमध्ये मला उभा राहायचंच आहे असं माझं काही नक्की नाही. पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तरी चालतंय. माझा एकच मुद्दा आहे की इकडचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. लोकांना भेटायचे आहेत, इथे विकास कसा आणायचा त्यापद्धतीने मला काम करायचं आहे.