जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का

टीम महाराष्ट्र देशा:रविवारी रात्री झालेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी हल्लेखोरांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आऐशी घोष हिच्यासह 9 विद्यार्थ्यांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषदेत सांगितले की, विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थ्यांपैकी चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, योगेंद्र भारद्वाज, प्रिया रंजन, विकास पटेल, डोलन, आइशी घोष अशी नावे आहेत.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी जॉय टिर्की म्हणाले की जेएनयू हिंसाचार प्रकरणाच्या तपासाबद्दल बरीच चुकीची माहिती पसरली जात आहे. १ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत परीक्षेच्या फॉर्म ची नोंदणी करायची होती. पण एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ आणि डीएसएफ विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास प्रतिबंधित केले. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते.याला काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी विरोध केला होता.

Loading...

यानंतर हा वाद आणखी वाढत गेला आणि 5 जानेवारी रोजी पेरियार आणि साबरमती वसतिगृहातील काही खोल्यांवर हल्ला करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी जॉय टिर्की यांनी सांगितले की, जेएनयूमध्ये हिंसाचार करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील तयार केले गेले. बुरखा घातलेल्या लोकांना माहित होते की त्यांना कोणत्या खोलीत जायचे आहे. हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज सापडले नसले तरीही आम्ही व्हायरल व्हिडिओद्वारे आरोपीची ओळख पटविली आहे. आम्ही याबद्दल 30-32 साक्षीदारांशी देखील बोललो आहे.

‘जेएनयू’ मध्ये रविवारी संध्याकाळी बुरखा घातलेल्या गुंडांनी हिंसेचे थैमान घातले होते. तीन तास संपूर्ण विद्यापीठामध्ये दहशतीचे वातावरण होते. पोलिसांना माहिती असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असाही आरोप करण्यात होता. या हल्ल्यामध्ये आयेशी घोष गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्या डोक्याला जबर मार बसला होता, खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर तिला तातडीने एम्स रुग्णालायात दाखल करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेले काही प्राध्यापक आमचे आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचारास प्रोत्साहन देत होते. असे म्हणत आयेशी हिने अश्विनीकुमार महापात्रा यांचे नाव घेतले होते.असा आरोप करणारी आयेशी आता स्वतःच या प्रकरणात आरोपी मानून समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार