fbpx

… तोपर्यंत पाकशी चर्चा नाही – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला लगाम घालणार नाही तोपर्यंत, पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने नमती भूमिका घेतल्याचं वृत्त देखील त्यांनी फेटाळलं.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की , “आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही. आम्ही नेहमीच अशी भूमिका घेतली आहे”, गेल्यावर्षी भारताने कुलभूषण जाधव यांच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रद्द केली होती.