शिवजयंतीच्या निमित्ताने निलंगेकर घराण्यातील संघर्ष मिटणार ?

प्रदीप मुरमे – शहरातील शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा नेते माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे ‘आजोबा -नातू ‘ एकत्र आल्याने ‘निलंगेकर’ घराण्यातील मागील २० वर्षापासूनचा असलेला टोकाचा हा राजकीय संघर्ष मिटणार का ? या दोन घराण्यामध्ये खरचं मनोमिलन होणार का ? असे विविध प्रश्न राजकीय विश्लेषकांना भेडसावत आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने परस्परांचे कडवे राजकीय विरोधक असलेले हे निलंगेकर आजोबा-नातू एकत्र आले.या उभयतांच्या या एकत्रित येण्याने काँग्रेस,भाजपाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या ! मागील अनेक वर्षापासून निलंगेकर घराण्यातील ही ‘भाऊबंदकी’ राज्याच्या राजकीय पटलावरील सातत्याने एक चर्चेचा विषय ठरली आहे.आजोबा-नातू व काका- पुतण्यामधील निलंगेकर घराण्याचा हा वाद उभ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.२००४ मध्ये डाँ.निलंगेकर यांच्याविरोधात भाजपाकडून निवडणूक लढवून आजोबांना पराभूत करुन संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राजकीय भूकंप घडविला होता.

Loading...

२००९ च्या निवडणूकीत संभाजीराव यांना पराभूत करुन आपल्या पराभवाचे उट्टे काढून ‘हम भी कुछ कम नही है’ हे डाँ.निलंगेकर यांनी प्रत्यक्ष निवडणूकीतून दाखवून दिले होते.दरम्यान २०१४ पासून डाँ.निलंगेकर राजकारणात सक्रीय न राहता आपले सूपूञ अशोकराव यांना पुढे केल्याने अशोकराव व संभाजीराव यांच्यात २०१४ व २०१९ च्या लढती रंगल्याने अशोकराव व संभाजीराव या निलंगेकर काका -पुतण्यांमधील वाद शिगेला पोहचला.दरम्यान या दोन्ही लढतीमध्ये अशोकराव यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला आजोबा-नातू व नंतर काका- पुतण्यामधील वाद या मतदारसंघाने पाहिला.कधीकाळी एकमेकांच्यामधून विस्तव ही न जाणाऱ्या या आजोबा- नातू यांच्यामध्ये अलिकडे मात्र जवळीकता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

परवा शिवजयंतीच्या निमित्ताने आजोबा -नातू व काका -पुतण्या हे निलंगेकर एकत्र आले.त्यामुळे निलंगेकर घराण्यातील भाऊबंदकी मिटणार का ? या दोन घराण्यामध्ये मनोमिलन होणार का ? या चर्चेला या निमित्ताने तोंड फुटले आहे.डाँ.निलंगेकर यांनी नुकतच नव्वदीत पदार्पण केले आहे.डाँ.निलंगेकर यांच्या जेष्ठत्वाचा विचार करता त्यांच्या जवळ जाण्याची प्रबळ इच्छा संभाजीराव यांच्या बोलण्यातून दिसत आहे.उतार वयात आजोबांची नाराजी दूर करुन निलंगेकर कुटूंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा त्यांचा मानस दिसत आहे.दोन्ही निलंगेकर घराण्यामध्ये मनोमिलन करुन विरोधकांचा बंदोबस्त करुन निलंगेकर घराण्यामध्येच सत्ता अबाधित ठेवण्याचे आडाखे बांधण्याच्या प्रयत्नात ते दिसत आहेत.

डाँ.निलंगेकर यांचा देखील यास विरोध नसून मूकसंमती असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांमधून बोलले जात आहे.२००९ मध्ये डाँ.निलंगेकरांचा संभाजीराव यांना जो विरोध होता तो आता मावळल्याचे दिसत आहे.अलिकडे ते संभाजीराव यांच्यावर टिका करत नाहीत तर त्यांचा राजकीय उत्कर्ष त्यांना आवडतो.ते सुखावतात,ते आनंदी होतात.एकुणच डाँ.निलंगेकर यांची अवस्था महाभारतातील भीष्माचार्यासारखी झाली आहे.नातू संभाजीराव यांना दूर करायचं नाही अन् सूपूत्र अशोकराव यांना राजकीयदृष्ट्या कसे प्रस्थापित करायचे हा प्रश्न सध्या डाँ.निलंगेकर यांना भेडसावताना दिसत आहे.तर संभाजीराव यांची राजकीय कर्तबगारी लक्षात घेता या मतदारसंघाची धूरा संभाजीराव यांच्याकडे सोपविण्याच्या मनस्थितीत डाँ.निलंगेकर दिसत असल्याचे आजोबा-नातू यांच्यातील अलीकडच्या जवळीकतेच्या विविध प्रसंगातून जाणवू लागल्याचे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे,हे मात्र निश्चित !

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती