तलायावाचा जावई मराठीमध्ये गाणार ?

टिम महाराष्ट्र देशा : ‘व्हाय दिस कोलावडी डी’ या गाण्यामुळे धनुष सिनेइंडस्ट्रीत नावारूपास आला . त्यानंतर त्याला ‘राजना’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची जादू सर्वांवरच चालली. धनुष आता चक्क एका आगामी मराठी चित्रपटासाठी गाणं गाणार असल्याचं कळतंय.

बऱ्याच दिवसांनंतर आपणास त्याचे गाणे ऐकायला मिळणार आहे, तेही मराठीत. अमोल पडावे दिग्दर्शित ‘फिल्कर’ या मराठी सिनेमातून तो गाणे गाणार आहे .या सिनेमाला इलीयारजा यांनी आपले संगीत दिले आहे. धनुष हा स्वतः इलियारजा यांचा मोठा चाहता आहे. त्यांनी या आधी त्यांच्या सोबत गाणे गाण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.फ्लिकरच्या निमित्ताने का होईना धनुषची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे .

‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित

मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस