…म्हणून पंकजा मुंडे करणार उपोषण

टीम महाराष्ट्र देशा : मी बेईमान होणार नाही. मी पक्ष सोडणार नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच 26 जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वज्रमूठ तयार करणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, 27 जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार आहे. तसेच महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनचं त्यांनी केलं आहे.

Loading...

पंकजा मुंडे आपली कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र पंकजा यांनी पुन्हा उभ राहण्याचा निर्धार केला आहे. तर आपण भाजप सोबतचं राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, मी एक-एक आमदार निवडून यावा यासाठी प्रचार करत होते. मग मी का बंड करेल ? देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पळत होते. मग मी बंड करणार असल्याची पुडी कोणी सोडली. मी कोणाकडेही काही मागणी केली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे कोणी सांगितलं. तसेच मी बेईमान होणार नाही. मी पक्ष सोडणार नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर