मनेसेचे पाण्यासाठी ‘शोले’ स्टाईल आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९२ टक्के जलसाठा आहे, तरीही नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा का केला जात आहे? म्हणून महानगरपालिकेत विरोधी पक्षांकडून आंदोलन करून प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले जात आहे.

मनसेच्या आश्विनी बांगर यांनी पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसे महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी केली आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. महानगरपालिकेच्या अधिकारी देखील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. आंदोलन करणाऱ्या बांगर यांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या