शर्मिला ठाकरे अजित पवारांच्या भेटीला;वाडिया रुग्णालय प्रकरणी घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा: राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज यांनी आज मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.मुंबईतील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रकरणी सरकारने तातडीने मदत करावी, यासाठी शर्मिला ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणी काल त्यांनी आंदोलनही केले होते.शर्मिला ठाकरे यांनी वाडियाचा प्रश्नात व्यक्तिगत लक्ष घातलं आहे.

शर्मिला ठाकरे यांनी उप आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासोबत वाडिया हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा केली.उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याऐवजी त्या थेट अजित पवारांच्या भेटीला का गेल्या? याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

वाडिया रुग्णालय बंद होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. 46 कोटी रुपये राज्य सरकार आणि महापालिका देणार आहेत. अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असं शर्मिला ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.