पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले

मुंबई : अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोनदा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विचारला आहे.

नुकतीच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली होती. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष असल्याने कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले होते.तसेच राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली होती. आंबेडकर यांनी केलेल्या टीकेचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला

नेहरू सेंटर येथे स्वत:च्या चित्रांवर भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, मला वर्ष आठवत नाही. पण, ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षाने डॉ. नीलम गोऱ्हे यांना उभे केले होते. त्याचा लाभ भाजपाचे प्रमोद महाजन यांना झाला होता. भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सांगू नयेत, असेही पवार म्हणाले.

मोहन भागवत म्हणजे ‘झुटा आदमी’- प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाला पाठींबा द्या, अन्यथा आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे