दिल्लीत ‘आप’ची ‘सरकारी सेवा आपल्या दारी’ योजना सुरु ! 

टीम महाराष्ट्र देशा- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने डोअरस्टेप डिलिव्हरी या महत्वाकांक्षी योजनेचा काल शुभारंभ केला. बऱ्याच महिन्यांपासून ही योजना उपराज्यपाल महोदयांनी अडकवून ठेवली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उपराज्यपालांचा हस्तक्षेप दूर झाला आणि तात्काळ ही योजना आप सरकारने लागू केली.

आपकडून प्रमुख मागणी असलेल्या लोकपाल अंतर्गत सिटीझन चार्टर कायद्यामध्ये सरकारी सेवांसाठी निश्चित कालमर्यादा नमूद आहे. परंतु केजरीवाल सरकारचा हा निर्णय त्याहूनही दोन पाऊल पुढे आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिल्ली सरकार अंतर्गत येणारे विविध विभाग जसे सामाजिक न्याय, जलबोर्ड, महसूल,समाजकल्याण, अन्न पुरवठा, कामगार आदी अंतर्गत सुमारे ४० सेवांसाठी घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी नाममात्र ५० रुपये इतके शुल्क लागू असेल. दिल्ली सरकारने १०७६ या क्रमांकावर टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे त्यावर फोन करून नागरिक त्यांना हव्या असलेल्या सुविधांची मागणी करू शकतात.

आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी मायावती मैदानात

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला या योजनेच्या सहकार्यासाठी आवाहन केले आहे. तसेच अंमलबजावणी करताना होणाऱ्या समस्यांची माहिती देण्याची विनंती केली आहे जेणेकरून अंमलबजावणी मध्ये सुधारणा करता येतील. सर्वसामान्य नागरीकांची छोटे छोटे सरकारी काम करून घेताना देखील त्रेधातिरपीट होते. नागरिकांना प्रसंगी लाच देऊन कामे करून घ्यावी लागतात.

संशय घेत बदनामी करण्याचा ‘भाजप पॅटर्न’ थांबवा-आप

महाराष्ट्रात मात्र अजूनही हेलपाटे आणि चिरीमिरी द्यावी लागत असल्याचा जनतेचा अनुभव आहे पुण्यात १११ सुविधा साठी सेवा हमी देत सुरु करण्यात आल्या . त्यातील १०० सेवांना अजूनही ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा नाही. मृत्यू दाखला , जन्म दाखला या सर्वासाठीच महापलिकेत अथवा वार्ड ऑफिस मध्ये अजूनही अर्ज , चलन , सही साठी खेटे घालावे लागत आहेत.

या उपक्रमाची दखल केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि अशाच अंमलबजावणी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार; सुरुवात राजघाटपासून?