संजय राऊत सकाळी केलेले विधान संध्याकाळी मागे घेतात ! हे कुणाच्या इशाऱ्यावरून होते : नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : संजय राऊत हे सकाळी केलेली विधानं संध्याकाळी मागे घेतात, हे कुणाच्या इशाऱ्यावर होतं असं म्हटलं आहे नितेश राणे यांनी. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांचा खरा वारसा मनसे प्रमुख राज ठाकरेच पुढे नेऊ शकतील. राज यांची वैचारिक भूमिका हिंदुत्ववादीच असल्यानं त्यांनी काल मांडलेल्या विचारांचं आम्हाला आश्चर्य वाटलं नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

तर माझं अंतरंग भगवं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. मात्र केवळ बोलून अंतरंग होत नसतं, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरलेली शिवसेना पुढील निवडणुकांमध्ये कुठेही दिसणार नाही, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार नितेश राणेंनी केली आहे.

Loading...

काल म्हणजेच २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती होती. त्या निमित्तानं गांधी घराण्यातल्या एका तरी व्यक्तीनं बाळासाहेबांना अभिवादन केलं का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू आहे.

बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. कित्येक शिवसैनिक बाळासाहेबांमुळे मतदान करतात. बाळासाहेबांना मानणाऱ्या या कडवट शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आवडलेली नाही.अशा शब्दांत नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात