सैराट फेम ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन

Ramchandra Dhumal

पुणे : ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. रामचंद्र धुमाळ हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांनी फॅन्ड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या, बोनसाय, छत्रपती शासन, बॅलन्स, वाघेऱ्या यांसह जवळपास १०० चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटसृष्टीत ते ‘धुमाळ काका’ या नावाने प्रसिद्ध होते.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व लघुपटांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप सोडली. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दिकी) वडिलांची भूमिका साकारली होती. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात त्यांची भूमिका अत्यंत छोटी होती, तरीसुद्धा ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

पहा, हार्दिक पंड्या २२८ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो ?

#व्यक्तिविशेष : खा.छत्रपती संभाजीराजे भोसले ….दीनदुबळ्यांसाठी लोकहितासाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा खरा लोकनेता

मजूर गेल्याने कामगार कमी पडत असतील तर भूमिपुत्रांना नेमा, देसाईंचे उद्योजकांना आवाहन