विश्वस्ताचे प्रसिद्धीपत्रक : देवस्थानचा धक्कादायक कारभार उघड ? 

blank
 टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान हे राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याचे शासन निर्णय झाल्यानंतर देवस्थान मध्ये शासकीय दप्तरात अफरातफर व बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर देवस्थानमध्ये विश्वस्तांना अजिबात विश्वासात न घेता देवस्थानमध्ये अनियमित कामगार भरती सुरू आहे. काल रात्री श्री शनैश्वर देवस्थान, शिंगणापूरचे विश्वस्त डॉ.वैभव शेटे पाटील यांचे निवेदन मिळाले असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.
शिंगणापूर देवस्थानबाबतीत शासननिर्णय झाल्यानंतर घाईघाईने देवस्थानमध्ये जे काही गैरप्रकार सुरू झाले आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत.हे सर्व गैरप्रकार कोण आणि कशासाठी करवून घेत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

डॉ.वैभव शेटे यांच्यासारख्या तरुण व कर्तव्यदक्ष विश्वस्तांनी मोठ्या हिमतीने हा गैरप्रकार जनता व भाविकांसमोर आणला त्याबद्दल ते निश्चितच कौतुक व अभिनंदनास पात्र आहेत.मात्र या गैरप्रकारांमुळे भाविकांच्या श्रद्धेशी व भावनांशी खेळण्याचे महापाप जो कोणी करत आहे वा करवून घेत आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.

 

‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस

जाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द