औरंगाबाद: शहरात सलग तीन दिवस शंभरपेक्षा अधिक रुग्ण निघत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. सध्याची वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णांना गृह विलगीरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी सांगितले. शहरात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक पार पडली. यावेळी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल तसेच खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व ऑक्सिजन प्रकल्पाची देखील सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वत: होम क्वारंटाईन राहावे त्यांनी घराबाहेर पडू नये.
सर्व रुग्णालयांनी रुग्णांची सर्जरी पूर्वी जशा इतर चाचण्या केल्या जातात तशाच प्रकारे कोविडची चाचणी देखील करण्याचे निर्देश दिले. वाढती रुग्णसंख्या पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने हॉटेलमध्ये/ रिसॉर्ट्स मध्ये होणाऱ्या गर्दीचे चित्रिकरण करावे. लसीकरण केलेले नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. तसेच त्यांनी मास्क परिधान केलेले असावे. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपवादात्मक वैद्यकीय कारण वगळता रजा घेता येणार नाहीत. शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी मंगल कार्यालयांना नियमित भेटी देण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
काय सुरु काय बंद?
शहराजवळील शेतामध्ये चालणाऱ्या हुरडापार्टीवर पूर्णपणे निर्बंध असतील.
मंगल कार्यालय व्यवस्थापनाने आगामी लग्नाच्या तारखांची माहिती प्रशासनाला कळवावी. ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापनाने प्रशासनाला लेखी द्यावे.
कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स जप्त करण्यात येणार आहे.
शहारतील शाळांतील १ ली ते ८ वीचे वर्ग बंद, नववी आणि दहावीचे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.
शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. केवळ वैद्यकीय कारण असेल तरच रजा मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
- भाजपचा अजून एक दावा ठरला फोल? काँग्रेसने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले,’पंजाब माफ नाही करणार’
- “मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<