‘महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहीम’; निलेश राणेंचा आरोप

nilesh rane vs uddhav thackeray

सिंधुदुर्ग : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत योग्य मदत करण्यासह दुरोगामी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केलं असून विरोधकांनी मात्र ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राजकीय पक्षांसह विविध संस्थांकडून देखील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरु असून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. ‘मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय?’ असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या