आमच्या पराभवाला राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार ; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

टीम महाराष्ट्र देशा : ”अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी नुक्संकरण वातावरण निर्माण करतात,’ असा आरोप कर्जत-जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपला आपली सत्ता गमवावी लागली. राज्यातील विविध विभागांत भाजपच्या झालेल्या पराभवाचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांतर्गत भाजपचे नेते आशिष शेलार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली व पराभवाची कारणं जाणून घेतली. या बैठकीला भाजपचे नेते राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘नगरमध्ये भाजपचे पूर्वीचे पाच आमदार असताना विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. विखे यांना नगरमध्ये यांना नगरमध्ये ताकदीचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’ असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या :