शिवसेना आमदारविरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र  देशा : पुणे-नाशिक महामार्गावरील अवैध प्रवासी वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने शिवसेनेने रविवार शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक अवैध प्रवासी वाहने फोडली. पोलिसांनी या प्रकरणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांवर बेकायदा जमाव जमवून हाणामारी केल्याचा गुन्हा सोमवारी रात्री उशिरा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर तसेच आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, पुणे – नाशिक रोडवर असणाऱ्या चाकणमध्ये देखील वाहतूकीचा खोळंबा होत आहे. रविवारी रात्री आमदार गोरे यांना देखील वाहतूक कोंडीला समोर जावं लागलं. त्यामुळे गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर महाराजांच्या स्मारकासाठी आंदोलनात उताराव लागेल : आ. अनिल भोसले