fbpx

शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash-Ambedkar

मुंबई : शरद पवारांनी मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्यानं झालो, असं सांगितलं. पण हे धादांत खोटं आहे, पवारांनी एवढंही खोटं बोलू नये अशी बोचरी टीका भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार यांच्यावर केली.

अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोनदा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी  प्रकाश आंबेडकर यांना विचारला होता. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर ?
शरद पवारांनी मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्यानं झालो, असं सांगितलं. पण हे धादांत खोटं आहे, पवारांनी एवढंही खोटं बोलू नये. मी जेव्हा खासदार झालो त्यावेळी माझा समझोता त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी झाला होता. शरद पवार यात कुठेच नव्हते. मला मुरली देवरा म्हणाले पवार यांना भेटायचं आहे, ते राजगृहावर भेटायला आले होते, मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही काँग्रेसशी चर्चा करा. शरद पवारांच्या दाव्यात काहीही तथ्य नाहीये. त्यांच्या यानंतरच्या वक्तव्याला उत्तर देणार नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर उतरू नये .