सडक्या कांद्याला एक रुपया भाव मात्र सदाभाऊंना किंमत नाही

प्रहार संघटनेने केला सदाभाऊंच्या फोटोचा लिलाव

पुणे : पुण्यात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय.राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हमीभाव मागता कशाला आता मार्केटिंग करा असा उपरोधी सल्ला दिला होता त्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी केलं.आंदोलनाला सडके कांदे आणले होते.तसेच महिलांच्या पोस्टरला सदाभाऊचा चेहरा लावला होता.त्याला सडके कांदे मारण्यात आले तसेच कांदे आणि पोस्टर यांचा लिलाव देखीलकरण्यात आला.

शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव एक रुपयाने घेतला मात्र सदभाऊच्या पोस्टरचा लिलाव करण्यात आला ते कोणीच घेतला नाही.सरकार शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देत नाही मात्र जर शेतकऱ्यांची अशी कोणी चेष्टा करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही.यापूढे कोणी शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शेतकऱ्याचं आसूड उत्तर देईल आसूड मोर्चा काढून त्याचा निषेध करण्यात येईल असं शेतकऱ्यांनी सांगितले.शरद जोशी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना यांनी एकत्र येत पुण्यात हे आंदोलन केलं.

  नेमकं काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव न मागता आपल्या मालाचं मार्केटींग करण्याचा सल्ला दिला होता. परदेशातील शेतकरी कधीही हमीभाव मागत नाहीत ते त्यांच्या मालाचे मार्केटींग करतात. तसं भारतातील शेतकऱ्यांनी देखील करायला पाहिजे. रामदेव बाबा त्यांच्या उत्पादनाचे मार्केटींग करतात म्हणूनच त्यांच्या मालाला मोठी मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील हमीभाव न मागता आपल्या उत्पादनाचे मार्केटींग करायला हवे असं ते म्हणाले होते. दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला.

You might also like
Comments
Loading...