मराठा समाज करणार रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना

टीम महाराष्ट्र देशा : सकल मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. पक्ष स्थापनेबद्दल कोल्हापुरात समाजाकडून मेळावा घेतला जाणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही.

छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही – हर्षवर्धन जाधव

समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला आहे.

कुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ