पेट्रोलचे नवे भाव, २५ ला पाव!

petrol

औरंगाबाद : देशभरात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैरान झालेत. पेट्रोल महागल्याने महागाई देखील वाढली आहे. महाराष्ट्रात साध्या पेट्रोलला शंभरी गाठायला केवळ काही पैशांचे अंतर बाकी आहे. शंभर रुपयांत आता एक लिटर पेट्रोल मिळत आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने एक नवा नारा दिला आहे. ‘पेट्रोलचे नवे भाव, २५ रुपयांना पाव’ असे ट्विट काँग्रेसच्या अकाउंटवरून करण्यात आले आहे. आता २५ रुपयांना पावशेर म्हणजे २५० मिली पेट्रोल मिळत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

दरम्यान, देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, तेल उत्पादक देश नफ्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होत आहे. प्रधान रविवारी आसामातील धेमाजी येथे बोलत होते. ते म्हणाले, ‘खनिज तेलाचे भाव वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे उत्पादन घटले आहे आणि तेल उत्पादक देश नफा कमवण्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. याचा परिणाम आयातदार देशांवर होत आहे.’

आम्ही अशी भाववाढ होऊ नये म्हणून तेल उत्पादक देशांच्या संघटना ओपेक आणि ओपेक प्लस यांच्याशी सतत चर्चा करत आहोत. या परिस्थितीत बदल होतील अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती मागील १२ दिवसात प्रचंड वाढल्या आहेत. काही राज्यांत दर शंभरच्या पार गेले आहेत. प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलवरील करांचं समर्थन करत ते विकास कामांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यातूनच रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या